Imgage
Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation LinksSkip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links

श्री क्षेत्र शिरडी येथील दर्शनाची पवित्र स्थाने
१) खंडोबा मंदिर: हे मंदिर नगर-मनमाड रस्त्यावर श्री साईबाबा हॉस्पिटलजवळ आहे. चाँद पाटलांच्या पत्नीच्या भाच्याच्या लग्नाचे वर्हाड जेव्हां शिरडीत आले तेव्हां या मंदिराजवळील वटवृक्षतळी ते उतरले होते. या वर्हाडासोबत आलेले श्री साईबाबा जेव्हां मंदिराच्या पटांगणात सर्वांसमवेत उतरले तेव्हा मंदिराचे पुजारी म्हाळसापती यांनी या बालफकीराचे “या साई” म्हणून स्वागत केले.
२)
गुरुस्थान : बाबा सोळा वर्षाचे असताना ज्या ठिकाणी प्रथम दृष्टीस पडले ते हे समाधी मंदिर परिसरातील ठिकाण. बाबा हे ठिकाण त्यांच्या गुरुचे आहे, असे सांगत असत. श्री साईसच्चरितात उल्लेख असलेला प्रसिद्ध नीम वृक्ष येथेच आहे. या ठिकाणी गुरुवारी व शुक्रवारी उद(लोबान, धूप) प्रज्वलीत केल्यास भाविकांचा दुःखपरिहार होतो, असा श्री साईसच्चरिताचा दाखला असून तसा अनुभवही येतो.                  
३) साईबाबांचे समाधी मंदिर : हे मुख्य मंदिर आहे. मंदिराची ही इमारत नागपूरचे निस्सीम साईभक्त श्री. गोपाळराव बुट्टी यांनी बाबांच्या आशिर्वादाने बांधली होती. म्हणून “बुट्टी वाडा” या नावानेही ती ओळखली जाते. या ठिकाणी श्री साईबाबांची पवित्र समाधी व मूर्ती आहे. नित्य पूजा, अभिषेक व चार आरत्या या ठिकाणी होतात.                       
४) व्दारकामाई (मशिद): बाबा शिरडीत आल्यापासून समाधिस्त होईपर्यत त्यांचे वास्तव्य सलग ६० वर्ष या समाधी मंदिर परिसरातील ठिकाणी होते. असंख्य भक्तांना या ठिकाणी बाबांनी कृपाप्रसाद दिला. बाबा ज्या शिळेवर बसत असत ती येथेच आहे. शिवाय बाबांनी प्रज्वलीत केलेली धुनी या ठिकाणी अखंडपणे प्रदिप्त आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाबा याच धुनीतून त्यांना उदी देत असत. आताही भक्तांना दिली जाणारी उदी याच धुनीतून प्राप्त होते. बाबा येथेच अन्न शिजवून भक्तांना वाढीत असत.                                                 
५) चावडी : एक दिवसाआड बाबा या ठिकाणी, जे समाधी मंदिर परिसराच्या जवळच पूर्वला आहे. मिरवणूकीने व्दारकामाईतून येत असत व मुक्काम करीत असत. आता प्रत्येक गुरुवारी रात्रौ ९.१५ ते १०.०० या वेळी व्दारकामाईतून चावडीकडे पालखी मिरवणूक निघत असते. या पालखीत बाबांची तसबीर, सटका व पादुका ठेवलेल्या असतात.
 ६) इतर स्थाने : बाबांच्या सान्निध्यात राहिलेले त्यांचे परमभक्त श्री. तात्या पाटील कोते, श्री. भाऊ महाराज कुंभार, श्री. व्ही. पद्मनाभ अय्यर, श्री. नानावली व श्री. अब्दुलबाबा यांच्या समाध्या समाधी मंदिर परिसरातच              लेंडीबागेजवळ आहेत.                                                                      
७) लेंडीबाग : समाधी परिसरातच असलेल्या या ठिकाणी बाबा फेरफटका मारावयास जात असत. बाबांनी स्वतः या ठिकाणी लावलेल्या पिंपळ वृक्षाशेजारी नंदादीप अखंडपणे तेवत ठेवलेला आहे. शिवाय या ठिकाणी दत्तमंदिर असून बाबांचा आवडता घोडा श्यामकर्ण (श्यामसुंदर) जवळच चिरनिद्रा घेत आहे. या ठिकाणी असलेल्या विहिरीस “बाबांची शिवडी” असे म्हटले जाते.                          
८) म्युझियम हॉल : साईबाबांच्या कालावधीत बाबांनी हाताळलेल्या वस्तू टमरेल, श्री साईंच्या पादुका, बाबांचा सटाका, जाते, ग्रामोफोन मशिन, चिलिम, घोड्याचा साज, अंगातील कुर्ता तसेच बाबांचे मूळ फोटो ग्राफ्स व इतर वस्तू साईभक्तांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
९) याशिवाय समाधी मंदिर परिसरातच श्री गणेश मंदिर, श्री शनी मंदिर व श्री महादेव मंदिर अशी तीन मंदिरेही आहे.