Imgage
Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation LinksSkip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links

 
आओ साई...

सस्नेह.....

     आम्हा साई भक्तांसाठी साईंची पालखी हा एक अभुतपूर्व सोहळा असतो याची प्रचिती गेली कित्येक वर्षे आमचे पदयात्री अनुभवतात. श्री साईनाथांच्या कृपेने आणि परमपूज्य गुरुवर्य श्री. शरदचंद्र परांजपे (काका) यांच्या आशिर्वादाने सुरु केलेली ही मुंबई ते शिरडी पदयात्रा आम्ही का करतोय......                                                              
      कारण साईपालखीत अग्रेसर असलेले साईंचे भगवे ।।निशाण।। आम्हाला भक्ती मार्गाची दिशा दाखविते याच पालखीतील निशाणाच्या मागोमाग असलेली साईंची ।।अबदागिरी।। आम्हा पदयात्रींचा आत्मविश्वास वाढविते. साईंचा ।।राजदंड।। आम्हास नियमांचे पालन आणि शिस्त बाळगण्याचे मनोधैर्य देतो. साईंसाठी सतत हलणारी ।।चवरी।। चैत्रातही आम्हांस गारवा देते. साईंचे ।।छत्र।। तर आम्हास आमच्या शिरावरील मायेचे छत्र भासते. ।।साईंची पालखी।। आमचा प्रवास सुखकर आणि आरामदायी करते. त्यात विराजमान असलेली ।।साईंची तसबीर।।आम्हास बाबांच्या अस्तित्वाचा क्षणोक्षणी प्रत्येय देते आणि साईंच्या पादुका वाहतात आमच्या पाऊलांचा भार... अशी इतक्या सुखाने व्यापलेली ही पदयात्रा आपण का करु नये ? साईच म्हणतात.                                                                                                                            
।। जे जे भक्त आले पायी । प्रत्येका दर्शनाची नवाई।।
।। कोणास काही कोणास काही । देऊनि ठायीच दृढ केले ।।