Imgage
Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation LinksSkip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links

अकरा वचने

शिरडीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे ॥१॥

माझ्या समाधिची पायरी जो चढेल । दु:ख हे हरेल सर्व त्याचे ॥२॥

जरी हे शरीर गेलो मी टाकून । तरी मी धावेन भक्तांसाठी ॥३॥

नवसास माझी पावेल समाधी । धरा दृढ बुद्धी माझ्या ठाइ ॥४॥

नित्य मी जिवंत जाणा हेचि सत्य । नित्य घ्या प्रचिती अनुभवे ॥५॥

शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा कोणी ॥६॥

जो जो मज भजे जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे मीही त्यासी ॥७॥

तुमचा मी भार वाहिन सर्वथा । नव्हे हे अन्यथा वचन माझे ॥८॥

जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस । मागे जें जें त्यास ते ते लाभे ॥९॥

माझा जो जाहला कायावाचामनी । तयाचा मी ऋणी सर्व काळ ॥१०॥

साई म्हणे तोचि तोचि झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी ॥११॥
Powered by:
Maharajasolutions.com