Imgage
Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation LinksSkip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links

  नमस्कार,

     ज्यांच्या आशिर्वादाने आज श्री श्रद्धा सबुरी सेवा मंडळ ही संस्था पंधराव्या वर्षात पदार्पण करतेय त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
     श्री श्रद्धा सबुरी सेवा मंडळ, ही संस्था गरजेतून निर्माण झाली असे म्हणायला हरकत नाही. श्री साईबाबांवरील श्रद्धेमुळे बाबांच्या दर्शनास जाणाऱ्या अनेक मित्रांचा एक समुह जमा झाला. नेहमी साईंच्या लीलांबद्दल चर्चा, त्यांच्या विषयीचे अनुभव एकमेकांना सांगणे, त्यांच्या भक्तीरसाची गाणी, भजनं म्हणण्यासाठी उपलब्ध असलेल्या वाद्यांबरोबर जमेल तेथे म्हणेल त्याच्या घरी साई भजन करणे हेच उपक्रम घेऊन आणि साईंच्या भक्तीने प्रेरित होऊन जमा झालेला हा समुह १९९५ साली सरकार दरबारी विराजमान झाला आणि त्याच वर्षी श्री साई दर्शनास पायी जाण्याचे ठरले,  अहो ठरले काय प्रत्यक्षात पदयात्रा सुरु देखील झाली. अजुनही आठवतेय ते पदयात्रेचे पहिले वर्ष.... आम्ही पस्तीस जण.... खांद्यावर बॅगा.... नियोजनाचा अभाव.... फक्त इच्छाशक्ती आणि साईभक्ती यांमुळे यशस्वी पदयात्रा. दुसरं वर्ष.... शंभर जण.... एक गाडी.... अनुभवाने आलेल्या शहाणपणामुळे यशस्वी. मग तिसरं वर्ष.... दिडशे जण.... दोन गाड्या.... गरजेप्रमाणे व्यवस्थित नियोजन.... आपापसात निर्माण झालेल्या दाट मैत्रीमुळे यशस्वी. चौथं वर्ष, प्रत्यक्ष खांद्यावर पालखी घेऊन... तीच इच्छाशक्ती तीच साईभक्‍ती आणि सर्वांचा भरघोस प्रतिसाद यामुळे यशस्वी. मग पाचवं.... सहावं.... सातवं अशी भराभर वर्ष उलटून गेली. हे चौदाव वर्ष. बदल ही काळाची गरज आहे आणि परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे ह्याच तत्वांवर निष्ठा ठेवून मनात येणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही एकमेकांच्या विचाराने करत गेलो. साईंच्या कृपेने यात आम्हाला कधीच अपयश आले नाही. अडचणी मात्र नक्कीच आल्या ह्या सर्व अडचणवर आम्ही मात केली ती केवळ आमच्या कार्यकर्त्यांमधील मैत्री आणि तुमच्या सारख्या उदार हितचिंतकांमुळेच प्रत्येक काम विचारपूर्वक व नियोजनबध्द करायचं हाच सर्व कार्यकर्त्यचा अट्टाहास यातच आमचं यश सामावलं आहे.                    
     इतक्या वर्षांच्या प्रवासात आम्ही अनेक मित्र जोडले यातला एक मित्र काळाने आमच्यापासून हिरावून घेतला, कै. मनोहर वामन कीर. एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व, यांच्या व श्री. शिवराम आरेकर यांच्या प्रोत्साहनामुळे आज या संस्थेने हे शिखर गाठले आहे. या सर्व धामधुमीमध्ये अहोरात्र काम करणारे आमचे कार्यकर्ते. कार्यकर्ते कसे असावेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे कार्यकर्त्याच्या पायाला चक्र, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असावी ही व्याख्या यांच्याकडे पाहिल्यावर सार्थ वाटते.
     या सर्व कार्यकर्त्यांना पदोपदी मोलाचे मार्गदर्शन लाभते ते आमचे मित्र  हितचिंतक सल्लागार श्री. अनिल घाटकर साहेब व श्री. बिपीनचंद्र व्यास यांचे. यांच्या सोबत आणखी अनेक कार्यकर्ते पालखी सोहळ्यासाठी वर्षभर काम करत असतात. त्या सर्वांचे हार्दिक आभार. खरं तर आभार मानणे चुकीचे ठरेल कारण ते काय किंवा आणखी कुणीही आपण सर्व प्रथम साईभक्त आहोत नंतर सभासद, कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक वगैरे.                                                                                                            
     मित्रहो, आम्ही साईंच्या भक्तीने प्रेरित होऊन ही मुंबई ते शिर्डी पालखी सह पदयात्रा आयोजित करतो आणि या पदयात्रे दरम्यान तुमच्या सारख्या दानशूर साईभक्तांच्या मदतीच्या आधाराने आमच्या हातून घडते छोटेसे समाजकार्य ते म्हणजे गरजू विद्यार्थ्यना गणवेश, वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप. यापुढेही असेच सहकार्य लाभावे  हिच साईचरणी प्रार्थना.                                                                      

धन्यवाद!